Namo PM Hafta Update मित्रांनो जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा नुकताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला तसेच राज्य सरकारने सुरू केलेल्या नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता तसेच तिसरा हप्ता सुद्धा राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन्ही योजनांचे मिळून 28 फेब्रुवारीला सहा हजार रुपये जमा झाले आहेत परंतु मित्रांनो राज्यातील असे बरेचशे शेतकरी आहेत की जे या योजनांच्या लाभासाठी पूर्णपणे पात्र आहेत.
परंतु 28 फेब्रुवारीला जमा करण्यात आलेल्या दोन्ही योजनांच्या हप्त्यांपैकी एकही हप्ता त्यांना मिळाला नाही म्हणजेच पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता सुद्धा नाही आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता सुद्धा त्यांना मिळाला नाही तसेच मित्रांनो असे सुद्धा शेतकरी आहेत की ज्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता तर मिळाला परंतु नम शेतकरी महासन्मान निधी योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही आणि विशेष म्हणजे त्यांचा काहीही प्रॉब्लेम नसताना त्यांच्या स्टेटस वरती सर्व काही ओके असताना सुद्धा त्यांना नमो शेतकरी योजनेचे हप्ते हे मिळाले नाहीत.
नमो योजनेचा हप्ता येत नसेल तर हे 3 स्टेप्स
तसेच मित्रांनो काही शेतकरी असे सुद्धा आहेत की ज्यांना पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता तसेच नम शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता असे एकूण चार हजार रुपये मिळाले परंतु नम शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता मात्र त्यांना मिळाला नाही आणि साहजिकच त्यांना हे दोन हप्ते मिळाले याचा अर्थ त्यांचा काहीही प्रॉब्लेम नाहीये त्यांच्या सर्व काही गोष्टी ह्या ओके आहेत पण तरीसुद्धा त्यांना तिसरा हप्ता हा मिळाला नाही तर हे असे का झाले पात्र असून सुद्धा या योजनांचे हप्ते का मिळाले नाहीत तसेच जे हप्ते तुम्हाला मिळाले नाहीत ते राहिलेले तुमचे हप्ते मिळतील की नाही तसेच जर मिळतील आपण अशा शेतकऱ्यांविषयी जाणून घेऊया की ज्यांना 28 फेब्रुवारीच्या दिवशी एकही हप्ता मिळाला नाही.
तर मित्रांनो जसे की जेवढे आपल्याला सर्वांना माहित आहे त्या माहितीप्रमाणे पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनांचे हप्ते न मिळण्याचे फक्त चारच प्रमुख कारण आहेत आणि ते म्हणजे पहिले आहे ई केवायसी नसणे दुसरे आहे बँक आधार लिंक नसणे तिसरे आहे भूमी अभिलेख नोंदी अद्यावत नसणे आणि चौथे म्हणजे या योजनेसाठी पात्र नसणे या चार कारणां व्यतिरिक्त हप्ते न मिळण्याचे इतर कुठलेही कारण नाहीये मित्रांनो तर मित्रांनो या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना तीन बाबींची पूर्तता करणे हे आवश्यक आहे पहिली म्हणजे ई केवायसी करणे दुसरे म्हणजे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करणे तिसरे म्हणजे भूमी अभिलेख नोंदी या पोर्टलवर अपडेट करणे.
नमो योजनेचा हप्ता सविस्तर माहिती
या तिन्ही बाबींपैकी कुठली ना कुठली एक गोष्ट अपूर्ण असल्या कारणाने तुम्हाला 28 फेब्रुवारीला हप्ते मिळाले नाहीत नंतर तुम्ही या बाबींची पूर्तता केली असेल तर तुम्हाला हे हप्ते पुढच्या हप्त्यावेळीस देण्यात येतील त्यामुळे तुम्हाला या गोष्टीची टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही कारण की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत फक्त तुमच्या या गोष्टी पूर्ण नसल्या कारणानेच तुम्हाला या ठिकाणी हप्ते हे देण्यात आलेले नाहीत त्याच्यानंतर मित्रांनो आता आपण या ठिकाणी अशा शेतकऱ्यांविषयी जाणून घेऊया की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता तर मिळाला परंतु नम शेतकरी योजनेचा एकही हप्ता त्यांना मिळाला नाही आणि विशेष म्हणजे त्यांचा काहीही प्रॉब्लेम नसताना त्यांना हे हप्ते मिळाले नाहीत.
तर मित्रांनो असे जेवढे पण शेतकरी आहेत की ज्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा मिळाला परंतु नमो शेतकरी योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही तर मित्रांनो या शेतकऱ्यांना सोळावा हप्ता मिळाला याचा अर्थ हे सर्व शेतकरी नमोच्या हप्त्यासाठी सुद्धा 100% पात्र आहेत यांना नमोचा हप्ता न मिळण्याचे कारण म्हणजे हा एक टेक्निकल इशू असू शकतो किंवा लाभार्थ्यांच्या बँकेचा प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे या शेतकऱ्यांना हप्ते हे वेळेत आले नाहीत परंतु एक दोन दिवसात हा प्रॉब्लेम सॉल्व झाल्यानंतर हे हप्ते तुम्हाला मिळून जातील तसेच ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा तसेच नमूदचा दुसरा हप्ता आला आहे आणि त्यांना तिसरा हप्ता आला नाही.
सर्वांना मिळणार योजनेचे पैसे
त्यांचा सुद्धा हाच प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे त्यांनी सुद्धा एक दोन दिवस वाट पाहायची आहे तुम्हाला न मिळालेले नमूचे हप्ते हे मिळून जातील कारण की तुमचे सर्व काही ओके आहे तुम्हाला हे हप्ते मिळवण्यासाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे एक दोन दिवस वाट पहा तुमचे न आलेले हप्ते हे नक्की तुम्हाला मिळून जातील परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी बाकी असेल किंवा बँक आधार लिंक करणे हे बाकी असेल तसेच भूमी अभिलेख नोंदी ह्या अद्यावत नसतील.
तर त्यांनी मात्र हे कामे पूर्ण केल्याशिवाय त्यांना हप्ते येणार नाहीत या तिन्ही गोष्टींपैकी जर तुमची कुठलीही एक गोष्ट अपूर्ण असेल तर ती त्वरित पूर्ण करून घ्या अन्यथा या योजनांचे पुढचे येणारे हप्ते सुद्धा घेण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि जर तुम्ही या गोष्टींची पूर्तता वेळेवर करून घेतली तर तुमचे मागचे राहिलेले हप्ते आणि येणारे पुढचे हप्ते असे सर्व हप्ते तुम्हाला मिळून जातील.