Kanda Chal yojana मित्रांनो राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे कांदा चाळ योजना आणि याच कांदा चाळ योजनेच्या लाभार्थी पात्रतेच्या अटी निकषामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर 9 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.
मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेले आहे की 18 मे 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत कांदा चाळीचा समावेश करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये अकुशलचा खर्च 96000 तर कुशलचा खर्च 64 हजार रुपये असं मिळून शेतकऱ्यांना एक लाख 60 हजार रुपयाचा अनुदान या कांदा चाळ योजनेच्या अंतर्गत देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्या संदर्भातील जीआर निर्गमित करून राज्यामध्ये योजना राबवायला सुरुवात करण्यात आली.
रोजगार हमी योजना कांदा चाळ
मित्रांनो या योजनेचा लाभ देत असताना रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत वैयक्तिक शेतकरी सामुदायिक रित्या शेतकरी एफपीओ अशा प्रकारचे जे काही स्वसहायता गट असतील या सर्वांना या ठिकाणी लाभ देण्यासाठीचे निकष एक अटी घालण्यात आल्या होत्या परंतु याच्यामध्ये 9 जुलै 2024 रोजी बदल करण्यात आलेले आहेत आता या योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक लाभार्थी या योजनेचा लाभ घेता येणार नाही मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कांदा चाळीसाठी प्रस्ताव देण्यात आलेले होते परंतु हे प्रस्ताव स्वीकारले जात नव्हते याच्या संदर्भात मोठ्या तक्रारी प्राप्त होत्या.
कोणाला मिळणार कांदा चाळ?
आणि आता अखेर शासनाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील एक शुद्धिपत्रक जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी सामुदायिक रित्या शेतकऱ्यांची जी लाभाची योजना होती ती फक्त आता सामुदायिक रित्या शेतकरी एफपीओ किंवा जे काही गट असतील अशा गटात यांना घेण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे अर्थात आता वैयक्तिक शेतकऱ्यांना रोजगार हमी योजने अंतर्गत कांदा चाळीसाठी ₹160000 अनुदान मिळणार नाही.
मित्रांनो वैयक्तिक शेतकऱ्यांना आरकेव्हीआयच्या अंतर्गत कांदा चाळीचं अनुदान दिलं जातं ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रति मेट्रिक टन ₹3500 एवढं तुकडा असं अनुदान दिलं जातं आणि याच कमी अनुदानामध्ये आता शेतकऱ्यांना जर कांदा चाळ उभा राहायची असेल तर अर्ज करावे लागतील तर मित्रांनो अशा प्रकारचे एक शुद्धिपत्रक शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहे जे आपण maharashtragovin या संख्या स्थळावरती पाहू शकता शकता.